जगभरातील क्रांती कारकऻचे प्रेरणास्थान : “लेनिन” – राहुल कैलास पगारे “चलो पलटायी” अशी घोषणा देत त्रिपुरातील जंगल डोंगरातील तरूणांना बांबू रबर उद्योग व्यापर पर्यटन यात रोजगार आणि उन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन आणि महत्वाचे म्हणजे आयपीएफटी (1996 साली नॅशनल लिबरेशन फ्रंट आॅफ त्रिपुरा हा सरकारने बंदी घातलेला गट आणि ट्रायबल नॅशनल व्हाॅलिंटिअर यांचे एकत्रिकरण) सोबत भाजपाने युती करत डाव्यांच्या एकहाती सत्तेला आव्हान देऊन त्रिपुरात सत्ता काबीज केली| आणि सर्वप्रथम त्यांनी डाव्या विचारांचे पहिले सरकार स्थापन करणा–या ‘लेनिन’चा पुतळा पाडला| रशियात ज्याने समाजवादी क्रांति सर्वस्वी यशस्वी केली आणि समाजसत्तावाद्यांचे पहिले सरकार स्थापन केले त्याचा पुतळा भाजपाने सत्ता हाती येताच पाडला| दक्षिण त्रिपुरातल्या बिलोनिया शहरातील लेनिनचा पुतळा पाडून भाजपा...