जगभरातील क्रांती कारकऻचे प्रेरणास्थान : “लेनिन”
– राहुल कैलास पगारे
“चलो पलटायी” अशी घोषणा देत त्रिपुरातील जंगल डोंगरातील तरूणांना बांबू रबर उद्योग व्यापर पर्यटन यात रोजगार आणि उन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन आणि महत्वाचे म्हणजे आयपीएफटी (1996 साली नॅशनल लिबरेशन फ्रंट आॅफ त्रिपुरा हा सरकारने बंदी घातलेला गट आणि ट्रायबल नॅशनल व्हाॅलिंटिअर यांचे एकत्रिकरण) सोबत भाजपाने युती करत डाव्यांच्या एकहाती सत्तेला आव्हान देऊन त्रिपुरात सत्ता काबीज केली| आणि सर्वप्रथम त्यांनी डाव्या विचारांचे पहिले सरकार स्थापन करणा–या ‘लेनिन’चा पुतळा पाडला| रशियात ज्याने समाजवादी क्रांति सर्वस्वी यशस्वी केली आणि समाजसत्तावाद्यांचे पहिले सरकार स्थापन केले त्याचा पुतळा भाजपाने सत्ता हाती येताच पाडला| दक्षिण त्रिपुरातल्या बिलोनिया शहरातील लेनिनचा पुतळा पाडून भाजपा ने डावा पक्षवाल्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कडक इशाराही दिला आणि उघड आव्हानही|
कोण हा लेनिन त्याचा पुतळा का पाडण्यात आला मुळात त्याचा पुतळा का उभारण्यात आला होता त्याचा आणि भारताचा काय संबंध असे प्रश्न नविन पीढीतील युवकांना पडने साहजिकच आहे| या लेखात आपण लेनिन कोण ? त्याचा आणि आपला काय संबंध ? त्याचे कार्यकर्तुत्व काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू|
पाश्र्वभूमी :
वोल्या नदिच्या काठावर वसलेल्या सिंबिस्र्क शहरात लेनिनचा जन्म दि|22 एप्रिल 1870 रोजी उल्यानोव ह्मा मध्यमवर्गीय कुटुंबात झाला|लेनिनचे खरे नाव व्लादिमीर| लेनिनचे वडिल इलिया निकोलाएविच यांनी खडतर परिस्थितीत कझान विश्वविद्यालयातून पदवी घेतली| ते गणित नी विज्ञानाचे शिक्षक झाले| मेहनतीच्या जोरावर बढती घेऊन ते शाळा इन्स्पेक्टर व शिक्षणाधिकारी झाले|
इलिया निकोलाएविच हे पुरोगामी विचारांचे होते| मागासलेल्या घटकांमध्ये ज्ञानप्रसार करण्याच्या कामास त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते| या कामातील त्यांचे अनुभव ते आपल्या मुलांना सांगत आणि सामान्यांच्या बकाल परिस्थितीला बदलण्यास प्रवॄत्तही करत|
लेनिनची आई मारिया अलेक्झांद्रोवना हिचे कार्य प्रशंसनीय असेच आहे| तीने घरी शिक्षण घेऊन अध्यापनाची पदविका मिळवली होती| आपल्या मुलांना क्रांतिकार्यात पुढे जाण्यास नेहमी तीने प्रोत्साहनच दिले| मोठा मुलगा अलेक्झांडरला फाशी झाल्यानंतरही ती डगमगली नाही| लेनिनच्या जडणघडणीत त्याच्या वडिलांपेक्षा त्याच्या आईचा प्रभाव अधिक पडलेला जाणवतो|
शिक्षण :
सुवर्णपदक मिळवत त्याने शालांत परिक्षा पास केली| त्यानंतर क्रांतिकार्यात सक्रीय सहभाग घेतल्यामुळे कझान विद्यापीठाने प्रवेशबंदी केली म्हणून सेंट पिटर्सबर्ग येथे बाहेरून प्रवेश घेऊन कायद्याची 1891 मध्ये कायद्याची पदवी पहिल्या वर्गात पास होउन घेतली|
प्रेम आणि विवाह :
क्रांतिकार्यात सक्रीय असताना सन 1894 मध्ये क्रुप्स्काया या शिक्षिकेशी त्याची ओळख झाली| ती ही क्रांतिकारी असल्यामुळे एकत्रित काम सुरू झाले| आणि लवकरच लेनिनला पुन्हा एकदा हद्दपारीची शिक्षा झाली| याच दरम्यान त्यांना दोघांनाही एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली| लेनिन पाठोपाठ क्रुप्स्कायालाही हद्दपारी झाली आणि दोघांना एकाच शहरात हद्दपारी मिळाली| यानंतर या जोडीने अखेर पर्यंतचा प्रवास एकत्र केला|
आजारपण आणि मॄत्यु :
लेनिनच्या विरोधकांनी सन 1918 साली लेनिनवर हल्ला करून गोळ्या घातल्या| मात्र यातून ते सुखरूप बचावले| सततची दगदग‚ प्रवास सभा मिटिंगा याचा परिणाम म्हणून 1922 मध्ये पक्षाघाताचा पहिला झटका आला| यातूनही ते अवघ्या तीन आठवडयात सावरले आणि 13 नोव्हेंबर 1922 च्या पहिल्या कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या सभेत भाषण केले| मात्र 1924 च्या 21 जानेवारीस पक्षाघाताच्या तीस–या झटक्याने मेंदूत रक्तस्त्राव होऊन त्यांचा मॄत्यु झाला| याबरोबरच सतत 40 वर्षें चाललेले कार्य समाप्त झाले|
भारताचा संबंध :
ज्यावेळी रशियात क्रांति झाली त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते| जनतेत इंग्रज सत्तेविरूध्द प्रचंड चिड आणि संताप होता| यातच रशियात लाल क्रांतिने जनतेची ताकद जगाने पाहिली होती| तशी ती भारतीय सामान्य जनतेने आणि क्रांतिकारांनीही पाहिली होती| ज्याप्रमाणे रशिया सारख्या मागासलेल्या देशातील गरिब शेतकरी कामगार आणि सामान्य नागरिक यांनी जुलमी झारची सत्ता उलथवून दिली त्याच प्रमाणे भारतीय जनतेत जागॄती झाल्यास इंग्रजांचा पाडाव करणे शक्य आहे हे त्यांना कळून चुकले होते| म्हणूनच तत्कालीन क्रांतिकारकांवर लेनिनचा प्रभाव पाहायला मिळतो|
स्वातंञ्यानंतर भारत रशिया संबंध :
भारताला स्वातंञ्य मिळाल्यानंतर रशिया आणि भारत यांच्यात नेहमीच मित्रत्वाचे संबंध राहिले आहेत| शांततेसाठी गुन्हेगारी दहशतवाद या विरोधात एकत्रित प्रयत्न सतत सुरू आहेत| तसेच भारत आणि रशिया यांच्यातील अणुकरार आणि इतर करार हे उभय देशांना विधिव विकासाच्या संधी देणारेच आहेत| युरोपीय समूहातील रशिया हे भारतासाठी नेहमीच मित्रत्वाचे संबंध असलेले राष्ट्र आहे| भारत रशिया मैत्री जगभर प्रसिध्द आहे|
नवयुगाचा इतिहास :
नुकतेच रशियात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि 77 टक्के मताधिक्याने व्लादिमिर पुतीन पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आले| रशिया युरोपातील एक सक्षम सधन आणि अमेरिकेला तोंड देण्यास समर्थ असा देश| अण्वस्त्रधारी असून शांतीचे आवाहन करणारा रशिया| व्लादिमिर पुतीन यांना जनतेने पुन्हा एकदा निवडून दिले कारण जगभर मंदिचा काळ चालू असताना आहे ती परिस्थिती खालावू नये म्हणून पुतिन यांना निवडून दिले| दुस–या कोणाच्या हाती सत्ता देण्यास रशियन जनता अद्याप तयार नाही हेच खरे|
अणू उर्जेत जगात अग्रेसर असा हा देश नेहमीच असा नव्हता| याच रशियात 20 व्या शतकाच्या सुरूवातीस लेनिन होऊन गेला| जुलमी झारशाहिच्या पाडावा नंतर हंगामी सरकारला दणके देत आक्टोबर लाल क्रांति यशस्वी झाली आणि शेतकरी‚ कामगार‚ सामान्य सैनिक यांनी एकमताने लेनिन यांना आपला अध्यक्ष म्हणून घोषित केले| आणि युरोपात नवयुगाचा प्रारंभ झाला|
तो काळ संक्रमणाचा होता| सामान्य नागरिक बंड‚ उठाव आणि प्रसंगी शस्त्र हाती घे}न मोठ मोठी साम्राज्ये उलथवून टाकत होती| अशा परिस्थितीत लेनिन यांनी रशियात माजलेली अंधाधुंद परिस्थितीचा फायदा घेत सशस्त्र क्रांती करूण हंगामी सरकार कडून सत्ता हिसकावून घेतली आणि श्रमिकांचे डाव्या विचारांनी प्रेरित सरकार स्थापन केले|
1848 साली जर्मनीत माक्र्स आणि एंगल्स यांनी ‘कम्युनिस्ट जाहिरनामा’ प्रसिध्द केल्यानंतर माक्र्सवादाने जग झपाटून गेले| लेनिन यांच्यावरही माक्र्सचा मोठा प्रभाव होता| याच विचारांच्या जोरावर त्याने रशियासह इतर छोटया मोठया राष्ट्रांना जोडून सोविएत संघाची निर्मिती केली| आणि कम्युनिस्टांचे सर्वाधिक काळ टिकलेले सरकार दिले|
19 व्या शतकाच्या शेवटी शेवटी रशियात भांडवलशाहीत वाढ झाल्याने कामगारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली| त्यांच्या व्यथाही वाढल्या अशा परिस्थितीत 1895 मध्ये लेनिनने सेंट पिटर्सबर्ग येथे ‘कामगार वर्गाच्या मुक्तीलढयाचा संघ’ या नावाने माक्र्सवादी विचार मानणारांची संघटना उभारली| या नंतर कामगार वर्गाची राजकीय पार्टी ‘सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी ’ ची स्थापना केली याचेच नाव बदलून नंतर ‘सोविएत कम्युनिस्ट पार्टी ’ असे करण्यात आले|
चळवळीला वर्तमानपत्राची आवश्यकता असते हे चळवळीला लेनिन यांनी ‘रबाचिये द्येलो ’ नावाचे वर्तमानपत्र सुरू केले मात्र याचा सुगावा झारला लागला आणि पहिला अंक निघण्यापुर्वीच लेनिन यांना सहका–यांसह कालकोठडीत डांबण्यात आले| शिक्षा संपताच 1901 साली छुप्या पध्दतीने ‘इस्क्रा’(ठिणगी) नावाने वर्तमानपत्र काढले आणि याच दरम्यान काही लेखांवर सही करण्यासाठी सैबेरियातील एका नदिचे ‘लेनिन’ हे नाव वापरले ते कायमचे|
1905 च्या क्रांतीतील रक्तपात पराभवानंतर लेनिन जगभर फिरले| मार्क्सवादाचा अभ्यास केला त्यात भर घातली| माक्र्सवादाचा प्रचार केला| कामगारांच्या शेतक–यांच्या संघटना बांधल्या| आणि योग्य संधीची वाट पाहिली| हि संधी 1914 ते 1917 च्या पहिल्या विशयुध्दाने आपसूकच उपलब्ध करून दिली| युध्दात वाढलेले प्रचंड उद्योग धंदे आणि कामगारांचे शोषण तसेच सामान्य नागरिकांना खाण्याचे हाल व्हायला लागले| यातूनच युध्दाने आणि वर्षोनवर्षें झारच्या सत्तेने त्रस्त झालेल्या मेटाकूटीला आलेल्या सामान्य रशियन जनतेने उठाव केला आणि झारची सत्ता उलथवून दिली| हंगामी सरकार सत्तेवर आले| रशियात आणीबाणी सदॄश्य परिस्थिती असताना हिच ती योग्य वेळ ओळखून स्थानिक नागरिक शेतकरी कामगार आणि सैन्य यांच्या पाठिंब्याच्या मदतीने 24 आॅक्टोबर 1917 रोजीच्या रात्री गुप्तपणे चळवळीच्या के॑द्रात प्रवेश करून लेनिन यांनी चळवळीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली| 25 आ^क्टो| रोजीच्या सकाळी 9 वाजे दरम्यान सोविएतांनी सर्व सरकारी कार्यालये बँका पोस्ट तार रेडिओ रेल्वे टेलिफोन आपल्या ताब्यात घेतली|
परिणामी हंगामी सरकार गडबडले आणि 26 आॅक्टो| रोजी हंगामी सरकारच्या सर्व प्रतिनिधींना सोविएतांनी पकडून बंदिस्त केले| याच दिवशी सायंकाळी अखिल रशियन परिषदेत एकमताने लेनिन यांच्याकडे सर्व सुत्रे देण्यात आली| सोविएतांचा विजय जगाने पाहिला| सर्व मालमत्तेची मालकी शेतक–यांच्या सोविएत मंडळाकडे आली| हि लाल क्रांति यशस्वी होऊन मार्क्सच्या विचारातील कष्टक–यांचे शेतक–यांचे कामगारांचे पहिले सरकार रशियात स्थापन झाले|
लेनिन यांची विचारसरणी :
लेनिन यांच्या यशाचे गमक म्हणजे त्यांनी सामान्य जनतेच्या व्यथेला दुखाला कारणीभूर घटकांना हात घातला| त्यांना शोषक वर्गाच्या तावडीतून सोडवले ज्यामुळे वर्गीय अंर्तविरोध लयास जाउन सर्वंकष विकास होऊ लागला| मार्क्स ए॑गल्सच्या विचारांचा अभ्यास करून मार्क्सने सऻगितलेल्या वरकड मुल्याच्या सिध्दांताचा वापर कामगार कष्टकरी यांच्या उत्थानासाठी केला| मार्क्सवादात स्थलकाल परत्वे भर घालून माक्र्सवाद लेनिनवादाची निर्मिती केली|
आपलाच साथी
लेखन : राहुल कैलास पगारे
मो|नं|9975210120
Comments
Post a Comment